९ ची नोट

 मी आज एका चहाच्या टपरीवर गेलो होतो. त्याला स्पेशल कटिंग चहा मागितला. चहा पिऊन झाल्यावर त्याला पैसे विचारले तर म्हणाला ९ रुपये झाले.


माझ्याकडे तर ९ रुपयांची नोट च नव्हती, पण दहाची एक नोट होती. मी त्याला तसं सांगितलं, तर म्हणाला, 'ठीक आहे. द्या १० रुपये मी तुम्हाला एक रुपया परत देतो.


त्याने ९ रुपयेच घेतले का माझ्याकडून? बरोबर आहे? बर, मग ठीक आहे.


वेद गणितात हेच सांगितलं आहे.


बेरीज आणि वजाबाकी करताना ५ पेक्षा मोठी संख्या असेल तर आपण वर त्या दुकानदाराने केले तेच करायचं.


९ रुपये म्हणजेच १०- १. म्हणजेच ९ चा दशपूरक आहे (-१)


त्याचप्रमाणे ९ हा आकडा न लिहिता आपण त्याचे -१ ह्या आकड्यात रूपांतर करून गणित सोडवू शकतो. 


हा पूरक लिहिताना त्याच्या डोक्यावर आडवी रेघ लिहायची आणि उजव्या बाजूला अंक असेल तर त्याच्या डोक्यावर एक बिंदू द्यायचा

                                     _

म्हणजेच ९ हा आकडा    * १ असा लिहिता येईल.


उदा.


   ३

+ २

+ ८

+ ९


हे गणित सोडवायच असेल तर


पहिली पायरी

  ३

+२


ह्याचे उत्तर आहे ५


आता ह्या ५ मध्ये दुसऱ्या पायरीत मिळवायचे आहेत ८                                           

                       _

मात्र ८ म्हणजे * २

त्यामुळे दुसऱ्या पायरी असेल


     ५ 

     -

+* २


म्हणजे ५-२ ज्याचे उत्तर आहे ३.


तिसऱ्या पायरीमध्ये आपण ह्या ३ मध्ये ९ मिळवायचे आहेत. 

                                       *_

इथेही आपण ९ चा दशपूरक   १ उपयोगात आणू.


त्यामुळे तिसरी पायरी असेल


    ३

    _

+*१


म्हणजेच ३-१ 


ह्याचे उत्तर आहे २.


आता ह्या आपण जेवढे बिंदू जोडले होते त्यांची बेरीज करून ह्या २ च्या उजवीकडे ठेवले तर उत्तर मिळेल २२.



म्हणजे आपले गणित 

  ३

+२

+८

+९

 

हे सोडवताना आपण खालीलप्रमाणे परावर्तित करू शकतो:


    ३

+  २

     _

+* २

     _

+*१



म्हणजेच एकमस्थानी सगळे अंक ५ पेक्षा कमी किमतीत परावर्तित झाले आहेत. त्यांची बेरीज खालील प्रमाणे

३+२+(-२)+(-१) = २


आणि दशमस्थानी असलेल्या बिंदूंची बेरीज आहे २.


त्यामुळे आपले उत्तर २२.



ह्याचप्रमाणे वेदगणिताच्या साह्याने आपण कितीही मोठ्या संख्येचे लहान संख्येत रूपांतर करून सोप्या पद्धतीने सोडवू शकतो.



शालेय शिक्षणात वेदगणिताचा समावेश करा, आणि गणिताचा बागुलबुवा दूर करा

Comments

Popular posts from this blog

८९७ चा पाढा

गुणाकाराशी मैत्री

अंकांशी दोस्ती