अंकांशी दोस्ती
आज रविवार. त्यामुळे आज विचार केला, मित्राला भेटू आणि गप्पा मारू.
मस्त गप्पा झाल्या. गप्पा मारता मारता डोसाही हादडला.
बिल झाले ८८ रुपये. आता ८८ रुपयांची नोट कुठून मिळणार?
काल चहावाल्याने शिकवलेले गणित मला लक्षात राहीले होते.
पण ते एक आकडी संख्या ९ बद्दल होते. इथे तर दोन आकडी संख्या होती. हॉटेलवाला म्हणाला ९० रुपये द्या मी दोन रुपये परत देतो.
म्हणजे ८८ ची किंमत ९०-२ अशी असते का.
पण मग वैदिक गणितात ती कशी लिहिता येईल.
संख्या कितीही आकडी असो नियम तोच
_
८८= ९२
काल एकेरी संख्या असल्यामुळे उजवीकडे जो आपण बिंदू दिला होता, त्याऐवजी आज दोन अंकी किंवा अधिक अंकी संख्येत उजवीकडच्या आकड्यात एकने वाढ करून किंमत लिहायची.(पहा टीप १)
पण झालं काय की माझ्याकडे ९० रुपयांचीही नोट नव्हती. मग तो हॉटेलवाला म्हणाला, ' १०० रुपये आहेत का बघा. मी १२ रुपये परत देतो.'
मी विचारात पडलो
१००-१२ म्हणजे पण ८८ होतात का?
मी वेदगणिताला विचारले
तो म्हणाला 'हो'
_ _
८८ म्हणजेच ११२
म्हणजेच वेदगणितानुसार
_
८८ ही संख्या ९२ अशीही लिहिता येते
_ _
आणि ११२ अशीही लिहिता येईल.
पण जर माझ्याकडे १०० ऐवजी १००० ची नोट असती तर....
सोपं आहे १०००-९१२
_ _ _
म्हणजे ८८ ऐवजी १९१२ असेही लिहिता येईल तर.
हे जे आपण संख्येचे रूपांतर करून डोक्यावर आडवी रेघ मारून संख्या लिहीत आहोत तिला औण्य संख्या म्हणतात. (पहा टीप २)
हो, औण्य संख्या वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येऊ शकते
_ _ _
८८ म्हणजेच ९२ म्हणजेच ११२
_ _ _
आणि म्हणजेच १९१२
वेदगणिताद्वारे अंक तेच फक्त वेगळ्या पद्धतीने लिहून आपण त्यांच्याशी दोस्ती नक्कीच करू शकतो.
टीप:
१) आपण उजवीकडची संख्या वाढवली त्याला म्हणतात 'एकधिकेन पूर्वेण' म्हणजे आधीच्या संख्येत एकने वाढ
२) अधिक उणे हे दोन शब्द मिळून 'औण्य' हा शब्द तयार झाला आहे.
८८ ऐवजी आपण पुढील पाया (१० च्या पटीतील संख्या) घेतो अर्थात आपल्या संख्येहून अधिक असलेला पाय घेतो म्हणून *अधिक*
आणि त्यातून आपली संख्या व पाया ह्यातील तफावत *उणे* (वजा) करतो.
Comments
Post a Comment