कठीण काय गणित की शिकवण्याची पद्धत?
कोणतं गणित सोपं आहे?
७८
+८९
की २२
+ ११
जर तुम्हाला ५ हुन अधिक संख्येची बेरीज वजाबाकी करायची असेल तर ते सोपे आहे की ५ आणि ५ पेक्षा लहान संख्येची बेरीज वजाबाकी सोपी आहे.
गणित कठीण नाही. गणित कठीण पद्धतीने शिकवले जात आहे. ती पद्धत बदला.
बेरीज वजाबाकी करण्यासाठी ५ हुन अधिक संख्याची आकडेमोड करायची गरजच नसेल तर....
दशपूरक: एखादया संख्येचा दशपूरक म्हणजे त्या संख्येचे दहापासूनचे अंतर (तफावत). उदा. ८ चे १० पासूनची तफावत आहे २.
म्हणजेच ८चा दशपूरक २.
नवपुरक: एखाद्या संख्येचे ९ पर्यंतचे अंतर (तफावत) म्हणजे त्या संख्येचा नवपुरक. उदा. ८ चे ९ पासूनचे अंतर (तफावत) आहे १. म्हणजेच ८ चा नवपुरक १.
दशपूरक आणि नवपुरक ह्यांचा उपयोग करून कोणतीही संख्या ५ किंवा ५ पेक्षा कमी संख्येत परावर्तित करता येईल.
संख्या एकमस्थानी असेल तर तिचा दशपूरक लिहायचा आणि इतर स्थानी तिचा नवपूरक लिहा
म्हणजे ७८ लिहिताना तीच संख्या
८ चा दशपूरक तर ७ चा नवपुरक ह्यांचा उपयोग करून त्या ऐवजी ती संख्या
_ _
२२ अशी लिहिता येईल.
_ _
म्हणजे बेरीज करताना ७८ऐवजी २२ अंक लिहून बेरीज करता येईल
शालेय अभ्यासक्रमात वैदिक गणिताचा अंतर्भाव करा, गणिताचा बागुलबुवा दूर करा.
Comments
Post a Comment